नाशिक

लासलगाव विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुजारी खोलीत चोरी

सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव शहरातील विद्यानगरमध्ये असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागे पुजारी खोलीत सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड चोरून नेत पोबारा केला. यासंदर्भात लासलगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामागे पुजारी खोली काढलेली आहे. यामध्ये भगवान संत व त्यांची पत्नी पूजेकरी म्हणून राहतात. सोमवारी रात्री दोघेही घरात नसताना चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचा ऐवज यामध्ये सोन्याची पोत, कानातील
कर्णफुले, चांदीचे दागिने तसेच 10,000 रुपये चोरून नेले आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण कार्यक्रम उत्साहात झाला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लासलगाव पोलिसांना घटनेची माहिती कळताच तातडीने पाहणी करून नाशिक येथील ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. यासंदर्भात अधिक तपास लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Theft in the priest’s room of Lasalgaon Vitthal-Rukmini temple

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago