महाराष्ट्र

अशा आहेत अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी

1 महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी एक समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबविले जाणार आहे.
2 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. ग्राम सडक योजनेंंतर्गत 30 हजार गावे जोडली. 2,450 किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 23 हजार पुलांचे काम हाती घेतले आहे. मुंबई-पुणे जलदगती रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली आहे.
3 गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचाही सहभाग करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषी विद्यापीठांत एआयची मदत घेतली जात आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. एक कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहेत. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे.
4 राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जाईल. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्र उभारणार आहोत. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रधानमंत्री सौर योजनेंंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई व पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवे स्टील हब म्हणून उदयास आले आहे.
5 मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू. पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
6 सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप-वे प्रकल्प उभारणार. नागपूरच्या रामटेकमध्ये चित्रसृष्टी उभारणार.
7 मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत.

These are the main provisions of the budget.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago