युद्धामुळे इंडस्ट्रीसाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद

व्यावसायिक गॅसही बंद होणार?

मुंबई : इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या झळा आता भारतातही जाणवू लागल्या आहेत. संभाव्य गॅस तुटवड्याचा विचार करून राज्य सरकारने गॅसचा वापर कमीत कमी करण्यावर भर देत उद्योगांसाठी लागणार्‍या 47 किलो आणि 450 किलो क्षमतेच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नयेत, अशा सूचना डीलर्सना देण्यात आल्या आल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांट येथून डीलर्सना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्लांट प्रशासनाने डीलर्सना व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी गाड्या पाठवू नयेत, तसेच नव्या ऑर्डर स्वीकारू नयेत, असे निर्देश दिले आहेत. व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असणारे 5, 19, 35, 47 आणि 427 किलो क्षमतेचे सिलिंडर सध्या पुरवठ्यासाठी थांबवण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स तसेच विविध उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवसांत व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

घरगुती गॅसला प्राधान्य

सरकारकडून घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारण युद्धामुळे आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावर किती काळ जाणवेल, याकडे उद्योग आणि व्यापारीवर्गाचे लक्ष लागले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago