मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस
सिडको : विशेष प्रतिनिधी
शहर व परिसरात सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले होते.
16 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट-2 चे अधिकारी व अंमलदार मोटारसायकल चोरीतील आरोपींचा तपास घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल घेऊन राजेंद्र केदारे (रा. सोयगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) वापरत असून, तो मालेगाव परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउनि गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी यांच्या पथकाने टेहरे (ता. मालेगाव) येथील सदगुरू कबीर आश्रम समाधी मंदिरासमोर सापळा रचून आरोपी राजेंद्र नाना केदारे (वय 28) याला ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून 50 हजार किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पो.उ.नि. मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते यांनी केली आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…