ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील देशवंडी येथे भरदिवसा घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणार्या संशयिताला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना घडली. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडून चोरीस गेलेला 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय राजू वाघिरे (रा. रेल्वे स्टेशन परिसर, रावेर, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
देशवंडी येथील सोमनाथ पांडुरंग आव्हाड (48) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.27) दुपारी आव्हाड कुटुंबीय घराला कुलूप लावून मांजरगाव (ता. निफाड) येथे गेले होते. दरम्यान, शेजारी राहणारे सचिन डोमाडे यांनी घराचे कुलूप तुटल्याचे पाहून आव्हाड यांना माहिती दिली. कुटुंबीयांनी घरी येऊन पाहणी केली असता, कपाट फोडून दोन तोळ्यांची सोन्याची पोत, चांदीचे जोडवे, चांदीच्या तोरड्या आणि सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 76 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरात शोध सुरू असताना सोपान काकड यांच्या शेतात एक तरुण संशयास्पदरीत्या पळताना दिसला. ग्रामस्थांनी त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल मिळून आला. चौकशीत त्याने आपले नाव अजय राजू वाघिरे (रा. रेल्वे स्टेशन परिसर, रावेर, जि. जळगाव)
असे सांगितले.
Thief flees from farm after burglary
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…