नाशिक

येवल्यात मध्यरात्री चोरट्यांनी फोडली दोन मेडिकल दुकाने

येवला : प्रतिनिधी

शहरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देवीखुंट परिसरात दोन मेडिकल दुकाने फोडून चोरी केली. याबाबत येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी थेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवीखुंट परिसराला लक्ष्य केले. येथील सूरज मेडिकल आणि आदर्श मेडिकल चोरट्यांनी शटर उचकटून फोडले. चोरट्यांनी दोन्ही मेडिकलच्या शटरची कुलपे तोडली. दरम्यान, येवला शहर पोलीस ठाण्याजवळच ही धाडसी चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा अचूक सुगावा लागावा यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब टीम आणि श्वानपथकाला पाचारण केलेे. फॉरेन्सिक टीम येईपर्यंत पोलिसांनी दुकान मालकांना आत जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे दुकानातून नेमकी किती रोकड व मुद्देमाल चोरीला गेला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Thieves broke into two medical shops in Yeola at midnight.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago