चॉकलेट, सिगारेटसह सुमारे 83 हजारांचा मुद्देमाल लंपास
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बसस्थानक परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुकाने फोडल्याने व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटी मोटेल्सच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली गोंदेश्वरी फुड्स अँड बेव्हरेजेस व साईछत्र पान स्टॉल ही दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली. चॉकलेट, सिगारेटसह सुमारे 83 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
सिन्नर येथील पंचवटी मोटेल्सच्या प्रवेशद्वारावर माजी नगरसेवक विजय जाधव यांचे गोंदेश्वरी फूड नावाने बेकरी व दुग्धजन्य उत्पादने विक्रीचे दुकान आहे. शेजारीच अनिल लहामगे यांचे साईछत्र पान स्टॉल आहे. रविवारी (दि.14) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन्ही दुकाने नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि.15) सकाळी साडेसातच्या सुमारास गोंदेश्वरी फुड्सचे व्यवस्थापक पंकज अग्रवाल दुकान उघडण्यासाठी आले असता, शटरचे कुलूप तुटलेले व पट्टी उचकटलेली दिसली. आत पाहणी केली असता दुकानातील चॉकलेट व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेजारील पान स्टॉलमध्येही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले.
या चोरीत गोंदेश्वरी फुड्समधून चॉकलेट व इतर वस्तूंसह सुमारे 15 हजार रुपये रोख, तर पान स्टॉलमधून विविध कंपन्यांच्या सिगारेट पाकिटांसह दोन हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. एकूण मिळून सुमारे 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही कॅमेर्यात एक चोरटा दिसत आहे. त्याने तोंड झाकल्याने ओळख पटलेली नाही. नाशिकहून फॉरेन्सिक व श्वानपथकही दाखल झाले.
बसस्थानक परिसरासारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या चोरीमुळे व्यापार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थ व व्यापार्यांकडून होत आहे.
Thieves plot in bus stand area, two shops broken into सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…