नाशिक

रेल्वेतून महिलेची पर्स लांबवणारे चोरटे जेरबंद

चार लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त

इगतपुरी : प्रतिनिधी
राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या महिलेची पर्स चोरणार्‍या दोन संशयितांना लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत मुख्य संशयितासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडहून मुंबईकडे जाणार्‍या राज्यराणी एक्स्प्रेसने नुसरत फातिमा कमरुद्दीन मुन्शी या पतीसह प्रवास करत होत्या. नाशिकरोड ते इगतपुरीदरम्यान त्यांची दोन मोबाइल, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 5 लाख 72 हजार रुपये किमतीची पर्स चोरीला गेली. ही बाब इगतपुरी रेल्वेस्थानकात लक्षात आल्यावर त्यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात
तक्रार नोंदवली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बाबूलाल चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली. नाशिकरोड ते इगतपुरीदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन संशयित निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेऊन मुख्य आरोपी फैजल फिरोज खान (वय 21, रा. वडाळा नाका, नाशिक) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याची पोत, चार सोन्याच्या अंगठ्या आणि आयफोन मोबाइल असा 4 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी फैजल खान याला रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच हस्तगत केला जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार
यांनी दिली.

Thieves who stole a woman’s purse on a train apprehended.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago