नांदगाव तालुक्यात तेरा हजार शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ

19 हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीकविम्यापासून वंचित

नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील जवळपास 33 हजार 300 शेतकर्‍यांनी खरीप हंगामात कपाशी, मूग, भुईमूग, मका, कांदा आदी पिकांचा पीकविमा उतरवला होता. त्यापैकी अवघ्या 13,528 शेतकर्‍यांना प्रत्यक्ष पीकविम्याचा लाभ मिळाला असून, जवळपास 19 हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीकविमापासून
वंचित राहिले असल्याने सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील खरीप हंगामात जवळपास 33 हजार 300 शेतकर्‍यांनी खरीप हंगामात आपल्या शेतीपिकाचा पीकविमा उतरवला होता. त्यापैकी अवघ्या 13 हजार 528 शेतकर्‍यांना पीकविम्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून, 19 हजार 772 शेतकर्‍यांचा पीकविमा संबंधित कंपनीने नाकारल्याने पीकविम्यापासून वंचित राहिल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे.
संबंधित 19 हजार 772 शेतकर्‍यांचा पीकविमा पीकविमा कंपन्यांकडून नाकारण्यात आला आहे. यामध्ये कापूस पीक पिकवणीनंतरच्या नुकसानीत समाविष्ट नाही. पीक आययू पातळीवर समाविष्ट नाही, डुप्किेट माहिती, कापणी कालावधी संपला, पेरणी कालावधीबाबत चुकीची माहिती, अपूर्ण माहिती, अवैद्य संरक्षण, उशिरा कळवणे, नुकसानीच्या घटनेची माहिती दिली नाही, जोखीम समाविष्ट नाही, अशा पद्धतीची विविध कारणं देत पीकविमा कंपनीने हा पीकविमा नाकारला आहे.
19 हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांचा पीकविमा नाकारल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शासनाने याबाबत लक्ष घालून सरसकट पीकविमा भरपाई मिळावी, अशी मागणी आता शेतकर्‍यांकडून केली जात आहे. खरीप हंगामात 13,772 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 11 कोटी 47 लाख 34 हजार 191 रुपयांचे अनुदान संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

रब्बी हंगाम 2024

प्राप्त अर्ज संख्या : 18049, पात्र प्रस्ताव : 2820, अपात्र प्रस्ताव : 15284. पीकविमासाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांसाठी मंजूर करण्यात आलेले अनुदान 8 कोटी 82 लाख 76 हजार 355 रुपये.

सन 2024 च्या खरीप हंगामातील तब्बल 19 हजार 772 शेतकर्‍यांचा पीकविमा संबंधित कंपन्यांनी नामंजूर केला आहे. त्यासाठी विविध कारणं पीकविमा कंपनीने दिली आहेत. त्यामध्ये कापूस पीक पिकवणीनंतरच्या नुकसानीत समाविष्ट नाही. पीक आययू पातळीवर समाविष्ट नाही, डुप्लिट माहिती माहिती, कापणी कालावधी संपला, पेरणी कालावधीबाबत चुकीची माहिती, अपूर्ण माहिती, अवैद्य संरक्षण, उशिरा कळवणे, नुकसानीच्या घटनेची माहिती दिली नाही, जोखीम समाविष्ट नाही, अशा पद्धतीची विविध कारणं देत कंपनीने हा पीकविमा नाकारला आहे.

खरीप हंगाम 2024

एकूण प्राप्त अर्ज संख्या : 33,300 पीकविम्यासाठी पात्र ठरलेल्या अर्जाची संख्या : 13,528, अपात्र ठरलेल्या अर्जाची संख्या : 19,772. पीकविमासाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांसाठी मंजूर करण्यात आलेले अनुदान तसेच वितरित करण्यात आलेले अनुदान 11 कोटी 47 लाख 34 लाख 191 रुपये.

क्र 1 ) रब्बी हंगाम 2024 मधील पात्र शेतकर्‍यांसाठी कंपनीकडून नुकसानभरपाईपोटी 8 कोटी 82 लाख 76 हजार 355 रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी काही अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असून, उर्वरित अनुदान लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

खरीप 2024 हंगामात अनेक शेतकर्‍यांनी आपला शेती पिकाचा पीकविमा उतरवला होता; मात्र त्यातील काही शेतकर्‍यांचा पीकविमा हा पीकविमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे, तर अनेक शेतकर्‍यांचा पीकविमा कंपन्यांकडून नाकारण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या शेतकरी हा अशिक्षित असल्याने पीकविमा कंपन्यांचे ठरवून दिलेल्या कालावधीत आपल्या नुकसानग्रस्त पिकाची माहिती शेतकर्‍यांना देता आली नसल्याने त्यांचा पीकविमा नामंजूर करण्यात आला आहे. परंतु, शासनाने या सर्व शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, एवढीच अपेक्षा.
शंकरसिंग सोळुंके
प्रगतिशील शेतकरी, बोराळे, ता. नांदगाव (नाशिक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *