नाशिकच्या ठाकरे गटाला सतावतेय ही भीती, केली ही मागणी

उमेदवाराचा प्रतिनिधी असल्याशिवाय

स्ट्रॉंग रूममध्ये कुणालाही प्रवेश नको

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली.चार जूनला मतमोजणी असल्याने सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे( ईव्हीएम) अंबड येथील मध्यवर्ती वेअर हाऊसच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्रांग रूममध्ये तांत्रिक अथवा अतांत्रिक कर्मचाऱ्याना प्रवेश द्यायचा असेल तर उमेदवार किवा त्यांचा प्रतिनिधी त्यांच्यासोबत असायलाच हवा या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.शिष्टमंडळात उमेदवार राजाभाऊ वाजे यांचाही समावेश होता.

नाशिक लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान यंत्रे अंबड येथील मध्यवर्ती वेअरहाऊसच्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.
निडणूक आयोगाने काही तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी सातत्याने तपासणी करण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून मतदान यंत्रामध्ये हेराफेरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने निपक्षपाती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. स्ट्रांगरूममध्ये कडक पोलीस बंदोबस्त आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.परंतु प्रवेशाची मुभा दिला जाणाऱ्या तांत्रिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून मतदान यंत्रामध्ये हेरा फेरी होण्याची जास्त शक्यता आहे तरी त्यांच्यासोबत प्रशासनाचे काही कर्मचारी व उमेदवार किवा उमेदवार प्रतिनिधी सोबत असल्याशिवाय स्ट्रांगरूममध्ये प्रवेश करण्यास अशा लोकांना मज्जाव करावा.स्ट्रॉग रूममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक नजर ठेवावी, असेही निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे,शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते,योगेश घोलप,माजी महापौर विनायक पांडे, निलेश साळुंखे, शैलेश सूर्यवंशी, मनीष बागुल, सुनील निरगुडे, मसूद जिलानी, संदेश फुले, राहुल ताजनपुरे, त्रंबक कोंबडे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *