नाशिक

हजारो भाविकांनी ओढला प्रभू जगन्नाथांचा रथ

‘जय जगन्नाथ‘च्या जयघोषाने आसमंत दुमदुमले

नाशिक : प्रतिनिधी
जय जगन्नाथ, जय बलभ्रद्र, सुभ्रद्रा माता की जय, या भाविकांच्या जयघोषांने पचवटीचा परिसर गुरुवारी (दि. 16) दुमदुमला. यंदाही भगवान जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साह, भक्तिपूर्ण वातावरणात जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथून सकाळी दहा वाजता विधिवत पूजा करून काढण्यात आली.
गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजता कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, आयोजक महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत रथयात्रेला प्रारंभ झाला. गेल्या चार वर्षांपासून रथयात्रा उत्सवाचे आयोजन श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती, पंचवटीच्या वतीने केले जात आहे.
विशेषत: या उत्सवात हजारोंच्या संख्येने शहरभरातील भाविक सहभागी होतात. पंचमुखी हनुमान मंदिर येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांच्या मूर्तींचा शृंगार, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर रथात मूर्ती विराजमान करण्यात आल्या. रथयात्रेचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी नाग चौकात स्वागत केले. महापौर हिमगौरी आडके, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सुनील बागूल आणि आमदार पंकज भुजबळ यांनी रथाचे दर्शन घेतले. रथोत्सवात खाकी आखाड्याचे महंत भगवानदास महाराज, स्वामिनारायण मंदिराचे माधव स्वामी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, राकेश चौधरी, दिलीप राठोड आणि सुरेश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली निघालेल्या रथयात्रेच्या अग्रभागी बँडपथक, मैदानी खेळांचे पथक, मृदंंगवादक, हनुमान निशाण तसेच विविध देवदेवतांच्या वेशभूषेतील भाविक सहभागी झाले होते. मार्गात ठिकठिकाणी रथाचे स्वागत व पूजन करण्यात आले.
रथोत्सवाच्या यशस्वितेसाठी मधुसूदन काबरा, धनंजय बेळे, नंदू कहार, बाळासाहेब पाठक, नरहरी उगलमुगले, सचिन लाटे, राहुल बर्वे, बाळासाहेब कोठुळे, समीर गांगोडे, सागर शिंदे, साईराज कोठुळे, राजू खैरनार, पराग जैन, परेश ठक्कर, रजित गौतम तसेच श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव समिती, भक्तमंडळ आणि पंचमुखी हनुमान मंदिर भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, पंचमुखी हनुमान मंदिरात 29 जुलैपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत भक्तिचरणदास महाराज यांनी केले आहे.

रथाचे येथून झाले प्रस्थान
रथयात्रेला पंचमुखी हनुमान मंदिर येथून प्रारंभ झाला. त्यानंतर जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेन रोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, नाग चौक आणि कृष्णनगरमार्गे पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर येथे येऊन रथयात्रेची सांगता झाली.

पुरुषांबरोबरच महिलांनाही मान
रथाच्या मागे भाविकांना प्रसाद, पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तसेच विविध प्रजातीची रोपे वाटप करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, रथ ओढण्यासाठी एका बाजूला पुरुष, तर दुसर्‍या बाजूने महिला भाविकांनाही मान देण्यात आला. रथ ओढण्याचे नियोजन पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले.

Thousands of devotees pulled Lord Jagannath’s chariot.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago