नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-महाविकास आघाडीतर्फे शनिवारी (दि.17) मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक सहभागी होतील,अशी माहिती उपनेते सुनील बागूल यांनी दिली. जिजामाता उद्यान ( राणीचा बाग ) भायखळा ते आझाद मैदान(मुंबई)असा महामोर्चा महाविकास आघाडीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात नाशिक जिल्ह्यातून किती शिवसैनिकांना न्यायचे याचे नियोजन करण्यासाठी शालिमार कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना बागूल बोलत होते.
यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे,उप जिल्हाप्रमुख निवृती जाधव,युवासेना प्रदेश सहसचिव मंनिष बागूल,माजी महानगरप्रमुख महेश बडवे,सूर्यकांत लवटे,शोभा गटकळ,मंगला भास्कर, मंदा दातीर आदी व्यासपीठावर होते. मोर्चात नाशिक जिल्ह्याती पदाधिकारी, लोकप्रतिनीधी,अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. बैठकीस नाशिक लोकसभा मतदार संघातील आजी माजी,शिवसेना पदाधिकारी,नगरसेवक, लोकप्रतिनीधी, विभाग प्रमुख,उप विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,युवासेना, पदाधिकारी,भारतिय विद्यार्थी सेना,महिला आघाडी पदाधिकारी,ग्रामीण भागातील तालुका प्रमुख,उप तालुका प्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख,गट प्रमुख, गण प्रमुख तसेच जि,प. सदस्य,प,स,सदस्य व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.