20 लाखांचा दंड; 403 जणांवर कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
प्लास्टिक प्रकरणी छोट्या विक्रेत्यांवर पाच हजारांची दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणार्या प्लास्टिक कारखान्यांवर कारवाईचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी काही महिन्यांपूर्वी नाशिक महापालिकेत येऊन केले होते. मात्र, त्याचे हे निर्देश हवेतच विरल्याचे वास्तव आहे. कारण कुठेही प्लास्टिक कारखानदारांविरोधात कारवाई झालेली नाही. उलट शहरात बाहेरून मोठ्या संख्येने उत्पादित प्लास्टिक येत असल्याचे चित्र आहे. मनपाच्या घनकचरा विभागाने सहा महिन्यांत 3 हजार 205 किलो प्लास्टिक जप्त करत विक्रेत्यांवर 20 लाख 40 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 403 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिद्धेश कदम यांनी महापालिकेत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह एमआयडीसीच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली असता, त्यावेळी त्यांनी प्लास्टिक प्रकरणी मोठ्या कारखानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. जरी कारखाना महापालिका हद्दीबाहेर असेल तेथे पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना कारवाई करता येणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. परंतु, कदम यांनी फक्त निर्देश दिले. पुढे मात्र कसलीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. परिणामी, नाशिकमध्ये प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने 1 जानेवारी 2024 ते जून 2025 दरम्यान कारवाईचा धडाका लावला आहे.
प्लास्टिक प्रकरणी कारवाई होऊनही शहरात प्रतिबंधित कारवाई येते कुठून, असा सवाल केला जातोय. त्यामुळेच छोटे-मोठ्या व्यावसायिकांकडे आजही प्लास्टिक आढळून येत आहे. घनकचरा विभागाने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी व सातपूर या सहाही विभागांत पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार प्लास्टिक विक्री करणार्यांचा शोध घेतला जात असून, दंडात्मक कारवाई केली जाते. प्रसंगी थेट गुन्हेही दाखल केले जात आहेत. शहराचा विस्तार गत दहा वर्षांत कमालीचा वाढल्याने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापरही वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, बाहेरून शहरात प्लास्टिक येत असल्याने पालिकेकडून शहरात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, शहराबाहेर जाऊन कारवाईचे अधिकार पालिकेला नाही.
शहरात कुणीही प्लास्टिकचा वापर करू नये, शासनाने प्लास्टिकवर प्रतिबंध घातलेला आहे. प्लास्टिकचा वापर करताना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल.
-अजित निकत, संचालक, घनकचरा विभाग
जानेवारी ते जूनपर्यंतची कारवाई
महिना गुन्हे दंडात्मक कारवाई जप्त प्लास्टिक
जाने. 130 655000 1050
फेब्रुवारी 81 410000 1413
मार्च 23 120000 40
एप्रिल 7 35000 12
मे 94 48000 444
जून 68 340000 246
एकूण 403 2040000 3205
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…