कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची स्वत:हून यशस्वी चढाई,बाहेर येताच बघ्यांची पळता भुई थोडी !

दोन तास रंगला थरार
सिन्नर:
तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) परिसरात सुमारे 60 फूट खोल पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने दोन तासांच्या खडतर परिश्रमानंतर स्वत:हून विहिरीतून चढाई करीत धूम ठोकली. विहिरीतून स्वत:हून वर आलेल्या बिबट्या पाहताच बघ्यांची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र दिसून आले.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर(माळवाडी) शिवारात खंडेराव पठाडे यांच्या शेतातील ऊसाची तोडणीचे काम सुरु होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसाची तोडणी शेवटच्या टप्प्यात असतांना ऊसात दबा धरुन बसलेला बिबट्या मजूरांना दिसला. मजूरांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि राहिलेला शिल्लक ऊस पेटवून दिल्यानंतर बिबट्याने ऊसातून धूम ठोकली.
फुलेनगर-घोटेवाडी रस्त्याला माजी उपसरपंच दत्तात्रय आनप आणि सुरेश आनप यांच्या सामाईक विहिरीत सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पडला. कुंत्रे भुंकण्याचा आवाज येत असल्याने आनप आणि माळी कुटुंबियांनी सदर बिबट्या विहिरीत पडतांना पाहिला. सदर विहिर सुमारे ते फूट खोल आहे. तथापि, सदर विहिरीत उन्हाळ्यामुळे एका कोपजयात केवळ तळाला गुडघाभर पाणी होते. जोराने पळत आलेला बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्यानंतर त्याला दम लागलेला असल्याने त्याला विहिरीतून पायजयासारख्या परंतू उंचभागातून वर येता येत नव्हते. विहिरीतून चढण्यासाठी असलेल्या चुकीच्या दिशेने बिबट्या चढू पाहता होता. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वाजयासारखी पसरल्याने विहिरीभोवती परिसरातील शेतकरी व बघ्यांची गर्दी झाली. सिन्नरच्या वनविभागाला विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती देण्यात आली. सुमारे दोन तास बिबट्याचे विहिरीतून बाहेर येण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर बिबट्याने विहिरीतून पुन्हा चढाई सुरु केली आणि क्षणार्धात बिबट्या सरसर वर आला. आणि विहिरीच्या कथड्याभोवती असलेल्या बघ्यांची पळताभुई थोडी झाली. मात्र बिबट्याने कोणालाही कोणताही त्रास न देता बिबट्या शेजारील भाऊसाहेब पठाडे यांच्या ऊसाकडे पळून गेला.
ऊस पेटवताच बिबट्याची धूम
खंडेराव पठाडे यांचा सुमारे पाच एकर ऊसाची तोड सुरु होती. शेवटी पाच गुंठे थोडा ऊस शिल्लक राहिला असतांना ऊसतोड कामगारांना ऊसात बिबट्या दिसला. बिबट्याला पळविण्यासाठी शिल्लक राहिलेला थोडा ऊस पेटवून देण्यात आला. त्यामुळे बिबट्याने ऊसातून पळ काढला. त्यानंतर बिबट्या फुलेनगर-घोटेवाडी रस्त्याला असलेल्या दत्तात्रय आनप व सुरेश आनप यांच्या पडक्या विहिरीत पडला.
वनविभागाने लावला पिंजरा
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊ पर्यंत बिबट्याने विहिरीतून चढाई करुन जवळच्या ऊसात आपला मुक्काम ठोकला. विहिरीत पडलेला बिबट्या जवळच असलेल्या ऊसात लपल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी फुलेनगर येथे पोहचले. सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी ए. बी. साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, महेंद्र पटेकर, नारायण वैद्य यांनी घटनास्थळी पिंजरा लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *