नाशिक

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा रॅली

पंचवटी : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्य पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुरुवारी (दि. 13) पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला.
आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा नाशिक महानगराध्यक्ष सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे नोंदवला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्याबरोबरच राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारताचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा ध्वज घेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मालेगाव स्टँड येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर मखमलाबाद नाका, पेठ फाटा, पेठ रोड, तीन पुतळा चौक, पेठ फाटा, दिंडोरी नाका मार्गे पंचवटी कारंजा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गावर तिरंगा ध्वजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
देशभक्तीपर वातावरणामुळे रॅलीला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या एकात्मतेसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
भाजपा महानगराध्यक्ष सुनील केदार यांनीही स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, देशासाठी बलिदान देणार्‍या वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण भाटे यांच्यासह मंडल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नगरसेवक सागर लामखडे, हेमंत शेट्टी, चित्रा तांदळे, सरिता सोनवणे, वाळू काकड, नीलम पाटील यांच्यासह सुनील आडके, नरेश पाटील, राहुल कुलकर्णी, उल्हास धनवटे, बबन ढगे, प्रणित सानप, अजिंक्य पगारे, गणेश पिंगळे, महेश महंकाळे, बापू सपकाळ, प्रवीण आहेर, शरद काकड, तुषार नाटकर आदी उपस्थित होते.रॅलीमध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.
राष्ट्रभक्तीचा जागर, तिरंग्याचा अभिमान आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देणारी ही रॅली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Tiranga Rally in Nashik East Assembly Constituency

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago