आस्वाद

तोल मोल के बोल

तोल मोल के बोल

लेखिका: देवयानी सोनार

सामाजिक जीवनात आणि राजकारणातील भाषेचा स्तर हा जपलाच पाहिजे, आपल्या बोलण्याने समोरच्याच्या मनाला छेद बसेल अथवा वेदना होतील. असे बोलणे टाळणे गरजेचे असते. टीका करताना सुद्धा सभ्य भाषेचा वापर राजकारण्यांकडून अपेक्षित असताना गेल्या काही दिवसांपासून राजकारणी मंडळींची भाषणे अथवा पत्रकार परिषदांमधील टीका जर बघितली तर भाषेचा स्तर तर खालावलाच आहे. शिवाय टीकासुद्धा पातळी सोडून केली जात आहे.
प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असते, परंतु आता राजकारणाच्या आखाड्यातही सर्व माफ केले जाते असेच सध्याचे चित्र आहे.(काही अपवाद वगळता) राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधक कायम एकमेकांचे शत्रू नसतात. हे जगजाहीर आहे. राजकारण्यांकडून अनेकदा सभा, माध्यमांसमोर, कार्यक्रमात अचानक किंवा जाणूनबुजून आक्षेपार्ह वक्तव्य केले जाते.त्यामुळे कधीतर आयोजकांना, पक्षाला घरचा आहेरही मिळतो.आणि जनतेकडून ट्रोलिंग केले जाते. विरोधकांना आयते कोलित मिळते ते वेगळेच.
राजकारण आणि राजकारण्यांकडून असभ्य भाषेचे उदात्तीकरण होत आहे. गेल्या अडीच वर्षांत राजकारणात अनेक घडामोडी झाल्या. पक्षांची शकले उडाली. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यामुळे तर एकमेकांवर दररोज टीकेचे बाण सोडले जात आहेत. राजकारण्यांची भाषा मर्यादेची पातळी ओलांडत असल्याचे चित्र राज्यातील जनता पाहत आहे. महिलांविषयी केलेले वक्तव्य असो वा राजकारण्याविषयी खालच्या पातळीवर केलेली टीका यातून कायमच टीकेचे धनी राजकारणी झालेले दिसून येतात.
यापूर्वी राजकारणी एकमेकांवर विरोध दर्शवताना सभ्यतेची भाषा, मर्यादा राखून बोलली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांत एकमेकांना अर्वाच्च भाषेत बोलून प्रसिद्धी मिळविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामध्ये अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, आदिवासी मंत्री विजयकुमार गावित, जितेंद्र आव्हाड, राम कदम, संतोष बांगर, अजित पवार, संजय राऊत, रावसाहेब दानवे, ओवेसी, नवनीत राणा, कंगणा राणावत आदी नेते मंडळींनी मर्यादा ओलांडल्या त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.
राजकारणी कोणत्या स्तरावरून राजकारणात आले आहे, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, अनुभव यामुळे देखील त्यांच्या भाषाशैली, वक्तृत्वातून व्यक्ती समजते. जितके आक्षेपार्ह वक्तव्यातून राजकारणी ट्रोल केले गेले तितके चांगले किंवा विशिष्ट विधानामुळेही चर्चिले गेलेले शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगर काय हाटील समदं ओक्के हाय असे आपल्या कार्यकर्त्यांचे फोेनवरचे संभाषणाने वेगळी झलक दाखविली.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यापासून एकमेकांवर आगपाखड करीत आहे. खोके सरकार, मिंधे सरकार हे वाक्य तर आता तोंडपाठ झाले आहेत. शिंदेंना ठाकरे गटाची मंडळी मिंधे म्हणतात. तर शिंदे गटाची मंडळी ठाकरेंना उद्ध्वस्त सेना म्हणून एकमेकांची टर उडवतात. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरू असून, इच्छुक, विद्यमान, भावी असे सर्वच छोटे-मोठे राजकारणी प्रचारात गुंतलेले असून, विरोधी सत्ताधारींमध्ये प्रचारसभेत, माध्यमांपुढे भाष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहेत.
अजित पवार आणि वादग्रस्त वक्तव्ये असे समीकरणच आहे असे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन कार्यक्रमांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केले. एका कार्यक्रमात मुला-मुलींच्या जन्मदराबाबतीत द्रौपदीसारखा विचार करावा लागेल, असे वक्तव्य केले.त्याशिवाय दुसर्‍या कार्यक्रमात बटणे कचाकचा दाबा म्हणजे निधी देण्यातही आम्ही हात आखडता घेणार नाही. समाजमाध्यमांवर त्यांना ट्रोल केल्यानंतर मी गमतीने बोललो याचाही आवर्जून उल्लेख केला.
राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही सुनेला बाहेरची म्हणून अवमानकारक प्रतिक्रिया दिली.खासदार अमोल कोल्हे आणि सहकार्‍यांनही छद्मी हास्य करीत प्रतिसाद दिला.
नेहमीच आपल्या वक्तव्यावरून कायम चर्चेत असणारे संजय राऊतांनीही अमरावतीतील महायुती भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल डान्सर, नाची, बबली असे संबोधले. यावर प्रतिक्रिया देताना रवी राणांनीही राऊत आणि उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दरबारी नाचतात असे वक्तव्य केले. याच विषयावर राऊत गेंड्याच्या कातडीचे आहे.ते दिलगिरी व्यक्त करणार नाही असे मनसेचे प्रवक्ते योगेश खरे यांनी केले. एकमेकांची उणीदुणी काढताना भाषेचा स्तर अलीकडच्या काळात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र अशी जी ओळख आहे. त्या प्रतिमेलाच तडा जात आहे. तरीही राजकारणी भाषेची पातळी सोडत असल्याने जनतेने तरी यापासून काय धडा घ्यावा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

लेखिका:   देवयानी सोनार

Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

11 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

18 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

18 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

18 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

19 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

19 hours ago