अवकाळीमुळे शेतकरी हतबल; आर्थिक गणित बिघडले
अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या बेमोसमी पावसामुळे टोमॅटो पिकाला चिरा पडल्यामुळे शेतकर्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. नीचांकी बाजारभावामुळे शेतकर्याचे आर्थिक स्रोत बिघडले.
शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आह. मोठा खर्च करून पिकविलेला टोमॅटोे जनावरांचे खाद्य बनले आहे.
खते, बी- बियाणे, औषधे महाग झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्यानी शेतीत काय नियोजन करायचे कोणते पीक घ्यायचे? या संभ्रमात शेतकरी सापडला आहे. टोमॅटोला एका बिघ्याला एक लाख खर्च येतो. बांबू, तारी, खते, औषधे, तणनाशक, टॉनिक आदी घ्यावे लागतात. रोपे नर्सरीतून एक रुपया 40 पैसे काडीप्रमाणे शेतकरी आणतात, त्याचे संवर्धन करून तारी बांधणी मजूर व शेतमजुरी 15 रुपये जाळीप्रमाणे खुडतात. मशागत सुतळी, तार बांबू आदींसाठी खर्च येतो. शासनाने दखल घ्यावी, असे शेतकर्यांनी सांगितले.
शेतीस लागणारे उपयुक्त खते ड्रीप, पाइप, औषधे बी-बियाणे सर्व महाग झाल्यामुळे शेती ना परवडणारी झाली. त्यात वातावरणाचा परिणाम, शेतकरी पूर्ण मोडकळीस आलेला आहे. शासनाने शेतकर्यांसाठी काहीतरी चांगली उपाययोजना आखावी शेतकरी जर संपला, तर सर्वच संपुष्टात येईल.
– नंदू सहाणे, शेतकरी, साकूर
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…