गुरुकृपा अडत्याने थकवले अडीच कोटी; पाच तास कांदा लिलाव बंद
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुकृपा या अडतदाराकडे आठ ते नऊ महिन्यांपासून दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले आहे. हे पैसे मिळावे, यासाठी तीन वेळा आंदोलन झाले. मात्र, शेतकर्यांना पैसे प्राप्त झाले नाही. बाजार समितीकडे अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांनी सोमवारी (दि.2) आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले.
जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतल्याने सुमारे पाच तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी शेतकर्यांशी संवाद साधत संबंधित अडतदाराच्या जमिनीचा व्यवहार झाला आहे. 17 जूनपर्यंत शेतकर्यांचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र, 17 तारखेला पैसे मिळाले नाही तर त्यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
पिंपळगाव बसवंतमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक होत असते. व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी करूनदेखील पैसे दिले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या अंतर्गत व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी केली होती. मात्र, त्यांनी शेतकर्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची देणी थकवली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…