नाशिक

बनावट कीटकनाशकाचा सात लाखांचा साठा जप्त

ग्राहक बनून अधिकार्‍याची नांदूरनाका परिसरात कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात बोगस बियाणे, कीटकनाशके विक्री करणारी टोळी सक्रिय असून, छुप्या पद्धतीने शेतकर्‍यांना कमी किमतीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. अशा संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे काम भरारी पथक करत आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉ. जगन सूर्यवंशी यांनी स्वत: ग्राहक बनून बनावट कीटकनाशकाची विक्री करणार्‍या संशयिताला भरारी पथकासह पोलिसांंच्या मदतीने ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी संशयित किशोर एकनाथ ठाकूरकडून सात लाखांचे बनावट कीटकनाशक जप्त केले. संशयितावर कीटकनाशक कायदा व कीटकनाशक नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्याचे गुणवत्ता नियंत्रण संचालक सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयाच्या भरारी पथकाने कारवाई केली. आंबा व केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेगुलेटरचा बिगर नोंदणीकृत किटकनाशक साठा जप्त केला. याबाबत माहिती अशी की, संशयित किशोर ठाकूर विनापरवाना किटकनाशकांची विक्री करत असल्याची माहीती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉ.जगन सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर डॉ. सूर्यवंशी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयीत ठाकूर कडे शंभर लिटर पॅक्लोब्युट्रेझॉल या बिगर नोंदणीकृत किटकनाशकाची मागणी केली. संशयिताने त्यांना सदर किटकनाशक देणार असल्याचे सांगून नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोडवर (एमएच 15 एच यु 3511) या वाहनामधून डिलिव्हरी देत असताना त्याचवेळी कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. यावेळी कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, कृषी अधिकारी राहुल अहिरे यांच्यासमवेत पोलीस हवालदार डी.आर पाटील व गोसावी यांच्या पथकाने केली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ.जगन सूर्यवंशी यांनी किटकनाशक कायदा व किटकनाशक नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायदा अन्वये संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत.

जिल्ह्यासह विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. तसेच विनापरवाना कृषी निविष्ठा विक्री करणार्‍यांंची नावे भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी.
-सुभाष काटकर, कृषी सहसंचालक

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago