Oplus_16908288
मुंबई महामार्गाचे काम संथगतीने : वाहनधारकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे ते पिंप्रीसदोदरम्यान दोन्ही मार्गिकेवर तीन पदरीकरणाचे काम एकाचवेळी संथगतीने सुरू आहे. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात दररोजचे अपघात घडत असून, शेकडो नागरिक जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत.
दररोज वाहतूक कोंडी व अपघात होत असतानाही काम करणारी यंत्रणा प्रवासी व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना करीत नाहीत, संबंधित प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांमध्ये होत आहे. गोंदे ते वडपदरम्यान कार्यरत असलेली इगतपुरी हायवे कंपनीही संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत एकाच ठिकाणावरील काम पूर्ण करण्याऐवजी दोन्ही बाजूंनी जागोजागी खोदाई करून ठेवल्यामुळे व वाहनधारकांसाठी कुठलेही सूचनाफलक न लावल्याने वाहने थेट खोदाई केलेल्या खड्ड्यामध्ये कोसळतात. गोंदे, पाडळी, मुंढेगाव व बोरटेंभे येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे अपघात व वाहतूक कोंडीचा रोज सामना वाहनधारकांना करावा लागतो. या उड्डाणपुलांच्या कामामुळे रविवारी (दि. 15) सकाळच्या वेळेत पाडळी फाट्याजवळ खोदाई केलेल्या खड्ड्यामध्ये एक चारचाकी वाहन जाऊन आदळले, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनातील प्रवासी जखमी झाले असून, वाहनाचे मोठे नुकसान
झाले आहे.
याबाबत काम करणार्या यंत्रणेला विचारणा केली असता त्यांनी मात्र वाहनधारकांचीच चूक असल्याचे सांगून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. केपीजी महाविद्यालयासमोर असलेल्या पादचारी पुलाच्याखाली रस्ता उंच केल्याने मोठे कंटेनर या पादचारी पुलाखाली अडकत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना लोकप्रतिनिधीही यावर गप्पच असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम करणार्या यंत्रणेने तत्काळ सुधारणा न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून देण्यात आला आहे.
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…