नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोडच्या नेहरूनगर समोरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील जगप्रसिद्ध बाळ येशूच्या दोनदिवसीय यात्रेचा उत्साहात समारोप झाला. दोन दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात्रेच्या दोन दिवसांच्या काळात देश-विदेशातून आलेल्या सुमारे अडीच लाख भाविकांनी बाळ येशूचे
दर्शन घेतले.
बाळ येशूला केलेला नवस पूर्ण होतो, अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी यात्रेतील भाविकांची संख्या वाढतच असते. यंदाही शिस्तीत आणि कोणतेही विघ्न न येता यात्रा पार पडली. नाशिक-पुणे मार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरात काल सकाळपासून गर्दी उसळली होती. भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. रविवारी यात्रेच्या दुसर्या दिवशी भव्य शामियानात सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत दर तासाला इंग्रजी, मराठी, कोंकणी, तमिळ आदी भाषांमधून पवित्र मिस्सा झाली. फादर एरोल फर्नांडिस व अन्य धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी अनेक भाविकांनी रक्तदान केले. शीतपेये, पाण्याच्या बाटल्या, पेढे आदी विक्रेत्यांना देवस्थानाच्या आवारात यंदा प्रथमच दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात आली होती. सेंट झेवियर्सच्या शिक्षकवृंदाने खाद्यपदार्थ तयार करून अल्पदरात विक्री केली. पोलिसांनी पुण्याहून येणारी अवजड वाहतूक देवळालीगाव, विहितगावमार्गे तर नाशिकहून येणारी वाहतूक टाकळी-जेलरोडमार्गे वळवली होती.
कोठेही गोंधळ, गडबड होणार नाही याची काळजी घेत हे भाविक महामार्गावरील प्रवेशव्दारात शिस्तीत रांगा लावून दर्शन घेत होते. शामियानात विशेष प्रार्थनेला हजेरी लावत आणि दुसर्या प्रवेशद्वारातून ते बाहेर पडत होते. त्यांनी आपली वाहने उपनगर पोलिस ठाणे, नेहरूनगर वसाहत, जयभवानी रोड आदी परिसरात शिस्तीत उभी केली होती. यात्रा परिसरात फळ तसेच भाजी विक्रेते, गृहोपयोगी वस्तूंचे फेरीवाले, खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रेते यांनी दुकाने थाटली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. लाखो भाविकांमुळे सकाळपासूनच नाशिक-पुणे मार्ग गजबजून गेला होता.
गेडियन्स पब्लिकेशनतर्फे भाविकांना बायबलच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, मल्याळम भाषेतील प्रती वाटण्यात आल्या. बाळ येशूला खेळणी, मेणबत्ती अर्पण करून नवस करण्यात आला. बाळ येशू चर्च, झेवियर्स स्कूल, फादर एरोल फर्नांडिस यांनी यात्रेचे संयोजन केले. अडीचशे स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली. मदत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, उद्घोषणा कक्ष सुरू करण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय झाली. उपनगर आणि नाशिकरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांना वाहतूक पोलिसांची मदत मिळाली.
Baby Jesus’ pilgrimage concludes with enthusiasm
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik