सीबीआय ची नाशकात मोठी कारवाई ;जी एस टी चा अधिकारी जाळ्यात
नाशिक -प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागातील इंजिनिअरला तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना . केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनेही नाशिकमध्ये मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. खास म्हणजे, सीबीआयच्या जाळ्यात मोठा अधिकारी गळाला लागला आहे. नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची ही पहिलीच आणि अतिशय मोठी कारवाई आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत आहेत.
सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील वस्तू व सेवा कर विभागाचे कार्यालय आहे. एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा सुप्रिंटेंडंट चंद्रकांत चवाहणके हाती लागला आहे. या सुप्रिटेंडंटने नक्की किती लाच घेतली, कुठे घेतली, कुणाकडून आणि कशासाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लाचेचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सीबीआयकडून सायंकाळीच सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…