नाशिक

हिरावाडीत स्कूल व्हॅनवर कोसळला वृक्ष

पावसामुळे पंचवटी परिसरात विविध ठिकाणी वृक्ष पडले

पंचवटी : प्रतिनिधी
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पंचवटीत अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. याशिवाय, परिसरात हिरावाडी भाऊसाहेबनगर, अयोध्यानगर, सुरती फरसाण, सिद्धेश्वरनगर, तसेच मखमलाबाद रोड भागातही कडुनिंब, उंबर, गुलमोहर यांसारख्या वृक्षांच्या फांद्या पडल्या तर काही ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या.
तसेच प्रभाग क्रमांक एकमधील किशोर सूर्यवंशी मार्गावरील शिवसमर्थनगर येथे कडुनिंबाचे झाड कोसळले होते. दरम्यान, हिरावाडी परिसरातील एका स्कूल बसवर वृक्ष पडल्याने तिचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अयोध्यानगरला एका उभ्या एम.एच.15 ए.के. 1690 या स्कूल व्हॅनवर झाडाची फांदी पडली. सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने व्हॅनमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. रात्रीपासून हजेरी लावलेल्या पावसाने कळसकरनगर, जुना आडगाव नाका, तसेच वरदविनायक परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तळे तयार झाले होते. प्रभाग क्रमांक तीनमधील वेगवेगळ्या भागात चार वृक्ष कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेविका प्रियंका माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या संबंधित विभागाला कळवून पडलेल्या वृक्षांच्या फांद्या व वृक्ष बाजूला काढण्याचे काम केले. प्रभाग क्रमांक एकमधील किशोर सूर्यवंशी मार्गावरील शिवसमर्थनगर येथे कडुनिंबाचे झाड कोसळले होते. सदर बाब परिसरातील नागरिकांनी नगरसेवक प्रवीण जाधव यांना संपर्क साधत सांगितली. नगरसेवक जाधव यांनी तात्काळ संबंधित विभागास कळविले आणि सदर उन्मळून पडलेले कडुनिंबाचे झाड काढून घेतले.

प्रभाग सहामधील गामणे मळ्याजवळही वृक्ष कोसळला

प्रभाग क्रमांक सहामधील गामणे मळा परिसरात झाड कोसळल्याची माहिती मिळताच प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेवक प्रमोद पालवे, वाळू काकड, नगरसेविका चित्रा तांदळे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत झाड हटवून आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

Tree falls on school van in Hirawadi

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago