पहिल्याच दिवशी 20 टवाळखोरांवर कारवाई
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक शहराप्रमाणे ग्रामीण भागात जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या
निर्देशाने ऑलआउट मिशन सुरू झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी रविवारी (दि.12) पहिल्याच दिवशी टवाळखोरांना दणका दिला.
भाविकांची वाहने अडवणार्यांसह नाहक रस्त्यावर भटकणार्या 20 पेक्षा जास्त टवाळखोरांना पोलिसी खाक्या दाखवत पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये प्रतिबंधात्म कारवाई केली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात भूमाफियांच्या कारनाम्यांनी दहशत निर्माण झाली होती. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारे कोणाला त्रास देत असतील, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, तकारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांनी जमीन हडप केलेली असेल, तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अवैध सावकारीविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. धाकदडपशा दाखवून वसुली करणारे असतील त्यांना कायद्याच्या आधारे शासन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील अवैध बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. बहुतांश बॅनर रात्रीतून गायब झाले आहेत. शहरात बेदरकार वाहन चालवणारे, डीजे वाजवून शांतताभंग करणारेही रडारवर आहेत. पोलिस ठाणे हद्दीतील काळे फिल्म लावलेल्या वाहनांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामार्फत कारवाई करून वाहनांच्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक गिते, हवालदार सचिन जाधव, पोलिस बोराडे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व वाहनधारकांना त्यांचे गाडीत लावलेल्या काळी फिल्म काढून टाकण्याबाबत आवाहन केले आहे.
जमीन हडपणे, गुंडगिरी करणे, धाक दाखवणे इत्यादी कोणत्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात संपर्क करावा. तातडीने कारवाई केली जाईल.
– महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, त्र्यंबक पोलिस ठाणे
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…