त्र्यंबकला उटीच्या वारीसाठी भाविकांची दाटी

नाशिक : प्रतिनिधी
संत निवृत्ती नाथ महाराज यांच्या उटीच्या वारीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने भाविकांच्या आगमनाने त्र्यंबक नगरी फुलून गेली आहे. निवृत्ती नाथ महाराजांच्या संजीवन समाधीला  चंदनाचा लेप लावण्यात आला, मागील वर्षी कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत उटीची वारी पार पडली होती, यंदा कोरोना निर्बंध नसल्याने उत्साही वातावरणात उटीची वारी पार पडत आहे, काल निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे प्रशासक भाऊसाहेब गंभीर, बंडा तात्या कराडकर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, नितीन सातपुते, ऍड विजय धारने,आदी सह भाविक वारकरी उपस्थित होते. मंदिरात हरिनामाचा गजर करण्यात आला.

वारीचा व्हिडिओ पहा

https://youtu.be/xndQA_XMDFo

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *