नाशिक

त्र्यंबकराजा पावला : सिटीलिंकला तिसर्‍या सोमवारी 44 लाखांचे उत्पन्न

सव्वा लाख भाविकांचा प्रवास

नाशिक : प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणजे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान. अशातच सध्या श्रावण महिना सुरू असल्याने लाखो शिवभक्त त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होत असतात. श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारला विशेष महत्त्व असून, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पायी फेरी मारल्याने घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, असा भाविकांचा विश्वास असल्याने लाखो भाविक तिसर्‍या श्रावणी सोमवारी त्र्यंबकनगरीत दाखल होत असतात.
याच शिवभक्तांच्या सोयीकरिता सिटीलिंकच्या वतीने रविवार तसेच सोमवार असे दोन दिवस नियमित बसफेर्‍यांबरोबर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. याच बससेवेच्या माध्यमातून त्र्यंबकराजा सिटीलिंकला पावला असून, सिटीलिंकला आजपर्यंतचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. सिटीलिंकला सोमवारी (दि. 11 ऑगस्ट) एकाच दिवशी तब्बल 44 लाख 8 हजार 945 इतके सर्वाधिक विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. सोमवारी (दि.11) विविध मार्गांवर नियमित व जादा अशा एकूण सुमारे 2439
बसफेर्‍या करण्यात आल्या व या
बसफेर्‍यांचा सुमारे 1 लाख 13 हजार 913 प्रवाशांनी लाभ घेतला व यापूर्वी 2023 च्या श्रावण महिन्यात म्हणजेच दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी सर्वाधिक 35 लाख 36 हजार 867 इतके सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले होते. 2023 नंतर थेट सोमवार, दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी हा 2023 चा विक्रम मोडून तब्बल 44 लाख सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. विक्रमी उत्पन्नाच्या माध्यमातून त्र्यंबकराजा सिटीलिंकला पावला असून, सिटीलिंक बससेवेचा लाभ घेतलेल्या शिवभक्त व नियमित प्रवाशांचे सिटीलिंकच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांनी दाखविलेला असाच विश्वास यापुढेही सिटीलिंकवर कायम ठेवावा, असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago