सिडको : विशेष प्रतिनिधी
वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल २० लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पवन पवारसह तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या नवीन सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात राहत असून, एप्रिल २०२३ ते १ मार्च २०२४ या कालावधीत पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार (दोघेही रा. जेलरोड, नाशिकरोड) आणि कल्पेश किरवे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, जेलरोड) या तिघांनी मिळून त्यांच्या घरी येऊन चाकूचा धाक दाखवला. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर या तिघांनी फिर्यादी महिलेला काळ्या काचा असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीत जबरदस्तीने बसवले. त्यांच्या व त्यांच्या पतीच्या नावावरील मालमत्तांसंदर्भातील अधिकार विशाल पवारच्या नावावर व्हावेत, यासाठी तयार करण्यात आलेल्या नोटरी आणि रजिस्टर जनरल मुखत्यारपत्रावर सह्या घेण्यात आल्या. यानंतर सेंट्रल बँक अंबड शाखेतील खात्यात २० लाख रुपये भरून ते पैसे काढण्यासाठी पुन्हा एकदा फिर्यादीला गाडीत बसवून बँकेत नेण्यात आले आणि ते पैसे आरोपींनी ताब्यात घेतले.
पवन पवार हा गुंड प्रवृत्तीचा असून परिसरात त्याची दहशत असल्यामुळे फिर्यादी महिला भीतीपोटी यापूर्वी तक्रार देऊ शकल्या नव्हत्या. त्यांना कोणी आधार नसल्यामुळे ते गप्प राहिले होते. मात्र अलीकडे परिसरातील नागरिकांनी त्यांना धीर दिल्याने त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिलकुमार…