पंधरा दिवसांत अडीच हजार महिलांचा सिटी लिंकने प्रवास
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्यावतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली. शहर बससेवेला नाशिककरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. परिणामी हीच बाब लक्षात घेत सिंटीलिंक त्याचप्रमाणे 26 एप्रिलपासून महिलांसाठी विशेष स्वतंत्र महिला बस सुरू करण्यात आली. शहरातील तीन मार्गांवर 8 फेर्यांच्या माध्यमातून या महिला विशेष बस सुरू आहे. मागील पंधरा दिवसापासून सुरू असणार्या महिला बसला महिलावर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
पंधरा दिवसात 2 हजार 380 महिलांनी या बस सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच महिलावर्गाकडून शहरातील इतर मार्गावरही महिला विशेष बस सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकुण तीन मार्गांवर 8 फेर्यांच्या माध्यमातून धावणार्या या महिला विशेष बस सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .
या मार्गांवर सुरू आहेत बस
पहिला मार्ग क्रमांक 101 फेरी क्रमांक 1) गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा सकाळी 9.30 वाजता तर फेरी क्रमांक 2) निमाणी ते गंगापूर गाव मार्गे सिव्हिल सकाळी 6 वाजता दुसरा मार्ग क्रमांक 103 फेरी क्रमांक 1 ) अंबडगाव ते निमाणी मार्गे सिम्बॉइसिस सकाळी 9 .25 वाजता तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते अंबडगाव मार्गे पवननगर संध्याकाळी 6 वाजता . तिसरा मार्ग क्रमांक 266 – फेरी क्रमांक 1 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका सकाळी 9 .30 वाजता तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सीबीएस सकाळी 9 .30 वाजता फेरी क्रमांक 3 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका संध्याकाळी 6 वाजता तर फेरी क्रमांक 4 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सीबीएस संध्याकाळी 6 वाजता यामार्गावर यावेळेत बस आहेत.