साडेआठ ग्रॅम एमडीसह 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार एमडी ड्रग्जविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना, सपोउनि गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत रिक्षा (क्र. एमएच 15 एफयू 9292) मध्ये दोन इसम एम.डी. ड्रग्जसह नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूरकडे जाणार्या रस्त्यावर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सापळा रचून सुमित अशोक थाईंजे (वय 27, रा. लोखंडे मळा, नाशिकरोड) व शाकीर हसन सय्यद (वय 32, रा. वडाळागाव, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अनुक्रमे साडेचार ग्रॅम (किंमत 22 हजार 500 रु.) व 4 ग्रॅम (किंमत 20 हजार रु.) असा एकूण साडेआठ ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले.
तसेच 1 लाख 50 रुपयांची रिक्षा व 20 हजार रुपये किमतीचे मोबाइल फोनसह एकूण 2 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सपोउनि गुलाब सोनार यांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपी व मुद्देमाल आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, पोहवा अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, प्रकाश महाजन तसेच अमली पदार्थविरोधी पथकातील सपोउनि सचिन चौधरी, विशाल पाटील व त्यांच्या
पथकाने केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…