नाशिक

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव.

ओझर : वार्ताहर
येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे यांचेसह सर्व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना इ्यत्ता पाचवी ते आठवीची शासकीय  पाठ्यपुस्तके वितरित करून अध्यक्ष व सर्व सदस्यासह मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू चॉकलेट गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, मार्च २०२५ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत दहावीचा निकाल ९५.६५ टक्के लागला. विद्यालयाने आपली उज्वल यशस्वी यशाची परंपरा सुरू ठेवली असून यावेळी एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक नववर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक नियोजन कामकाज रूपरेषा व विविध शासकीय परीक्षा याविषयी माहिती दिली. शेवटी त्यांनी, पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा शिक्षक व पालक एकत्र येऊन प्रयत्न करूया, तसेच या वर्षात प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येईल त्याचे सोने करूया, त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास जिज्ञासा सकारात्मक विचार घेऊन हे वर्ष यशस्वी करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी स्वागत प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष भास्करराव शिंदे म्हणाले की, ओझर परिसरात माधवराव बोरस्ते विद्यालय हे शैक्षणिक संकुल सर्वगुणसंपन्न असून विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने पालकांनी आपले विद्यार्थी या विद्यालयात दाखल करण्याचे आवाहन परिसरातील पालक व ग्रामस्थांना केले. फलक रेखाटन कला शिक्षक मोहन क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी परिसरातील पाचवी ते दहावीचे अनेक पालक व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले शितल हांडोरे यांनी केले.
Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago