स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
सिन्नर : प्रतिनिधी
गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाहतूक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात वाहनाला ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सोमवारी (दि.26) नाशिक- पुणे महामार्गावर गांजाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
नाशिक – पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने दुचाकीवर दोन जण अवैधरीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, कर्मचारी नवनाथ सानप, विनोद टिळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, कर्मचारी प्रकाश उंबरकर, रुपेश शिंदे त्यांनी सापळा रचला आणि संशयित अलगद जाळ्यात सापडले.
मस्प्लेंडर मोटरसायकलवर जाणारे अरबाज नासीर पठाण (वय 22, रा. सुकदेवनगर, पाथर्डीगाव, नाशिक) आणि किरण मानप्पा बडगेर (23, रा. पवार हाउस, अंबड, नाशिक) यांंना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून 60 हजार रुपयांचा सुमारे तीन किलो गांजा व स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 90 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे दोघेही बेकायदेशीररीत्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने वाहतक करताना सापडले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…