गोवंश कत्तलीप्रकरणी दोघे ताब्यात, 80 किलो गोमांस जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर व परिसरात गोवंशाची कत्तल करून त्यांची वाहतूक व विक्री होत असल्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार संबंधितांवर कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे राधे सोसायटी, सह्याद्री हॉस्पिटलच्या पाठीमागे, नाशिक येथे छापा टाकला. घटनास्थळी हॉलमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले. छाप्यात 80 किलो गोमांस व त्याचे तुकडे, अवयव मिळून आले.
तेथे उपस्थित असलेल्या दोन इसमांची नावे अरबाज अस्लम कुरेशी (28, रा. राधे सोसायटी, द्वारकानगरी, नाशिक) आणि दानिश रफिक कुरेशी (30, रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) अशी आहेत. त्यांच्यासोबत असलेला तिसरा इसम शोएब समद कुरेशी (34, रा. कसाईवाडा, कुरेशीनगर, वडाळानाका) हा घटनास्थळावरून पळून गेला. तिघांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार डी.टी. गाढवे करीत आहेत. ही कारवाई पोलिस मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहा. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देवीदास गाढवे, पोलीस शिपाई दीपक जगदाळे आदींनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *