दोघे ताब्यात;पंचवटी गुन्हे शाखेची कामगिरी
पंचवटी/ सिडको : प्रतिनिधी
भावाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या संशयावरून दोघांनी फुलेनगर परिसरात एकाचा डोक्यात आणि चेहर्यावर गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना सोमवारी ( दि.2) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या यात खून झालेल्याचे संजय तुळशीराम सासे असे नाव असून, या गुन्ह्यातील दोन संशयितांना अवघ्या दोन तासांच्या आत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 2) मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तक्रारदार रूपाली संजय सासे (रा. घर नं. 1288, महालक्ष्मी चाळ, शेखबाईची गल्ली, महाराणा प्रतापनगर, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) यांचे पती संजय तुळशीराम सासे ( 40) हे घराच्या पाठीमागे असलेल्या म्हसोबा मंदिराकडे देवीचे गाणे चालू असल्याने, ते ऐकण्यासाठी घराच्या बाहेर गेले होते. त्यानंतर मध्यरात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास जुनी 56 नंबर शाळेच्या पाठीमागे, प्रवीण किराणाजवळ, गोंडवाडी, फुलेनगर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात व चेहर्यावर कशाचे तरी सहाय्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारून पळून गेले. संवेदनशील गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बढे यांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस ठाण्याचे पथके रवाना करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना मानवी कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा संशयित विशाल कैलास क्षीरसागर (24), धीरज मनोहर सकट (30, दोघे रा. विजय चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) यांनी केली असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी हे अवधूतवाडी, गणपती मंदिराच्या छतावर लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर व गुन्ह शोध पथकाचे अंमलदार यांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बढे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पंकज सोनवणे, सचिन चव्हाण, प्रकाश नेमाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार संतोष जाधव, महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, अमोल काळे, संदीप बाविस्कर, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस अंमलदार कुणाल पचलोरे, अंकुश काळे, विनोद चितळकर, वैभव परदेशी, योगेश वायकंडे, अश्विन कुमावत, नितीन पवार यांनी पार पाडली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव हे करत आहेत.
भावाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संशय
संशयितांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता मयत संजय तुळशीराम सासे याच्यामुळे संशयित विशाल कैलास क्षीरसागर याचा भाऊ प्रमोद कैलास क्षीरसागर हा दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी मयत झाला असल्याचा संशय होता. संशयित विशाल क्षीरसागर याचा भाऊ हा घरीच मयत झाला होता. परंतु संशयिताला वाटत होते की, मयत संजय सासे यानेच काहीतरी केले आहे. यावरून संशयित विशाल क्षीरसागर याच्या मनात राग होता.त्याच रागातून त्याने त्याच्या साथीदारासह संजय तुळशीराम सासे याला ठार मारले.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…