नाशिक

दोन दिवसांच्या संततधार पावसाने भोजापूर धरण भरले

ओव्हरफ्लोमुळे 32 गावांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा; म्हाळुंगी, देवनदीला पूर

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील दोन दिवसांच्या संततधार पावसाने शेतीसह पाणीपुरवठा व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे 2.45 वाजता तालुक्यातील सर्वांत मोठे भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले. धरण भरल्याने मनेगावसह 22 गावे, कणकोरीसह 5 गावे आणि निमोणसह 5 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. पश्चिम भागातील मुसळधार पावसामुळे म्हाळुंगी आणि देवनदी दुथडी भरून वाहत असून, शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असताना पूर्व भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. खरिपाची सुमारे 95 टक्के पेरणी पूर्ण झाल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकर्‍यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.
361 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेले भोजापूर धरण गुरुवारी दुपारी भरून वाहू लागले. बुधवारी रात्री तालुक्यात 25.1 मिमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात आतापर्यंत 198.4 मिमी, तर हंगामातील एकूण पावसाची नोंद 246 मिमी इतकी झाली आहे. देव आणि म्हाळुंगी नद्यांना पूर आला असला तरी पावसाचा वेग नियंत्रित असल्याने कुठेही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. उलट वेळेवर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जामगाव, पास्ते शिवार तसेच माळेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सरदवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सरदवाडी, जामगाव, पास्ते, लोणारवाडी, भाटवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मंडळनिहाय पावसाची नोंद (मिमी)
डुबेरे 16.5, देवपूर 22.5, वावी 15.0, शहा 25.5, नांदूरशिंगोटे 19.0, सोमठाणे 16.5, नायगाव 24.0, वडांगळी 24.0, पांगरी 28.5, गोंदे 19.5.

Two days of continuous rainfall filled the Bhojapur Dam.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago