मनमाडला क्रेन- टँकर भीषण अपघातात दोन ठार तीन गंभीर

मनमाडला क्रेन- टँकर भीषण अपघातात दोन ठार तीन गंभीर
मनमाड:आमिन शेख

– शिवजयंती उत्सव निमित्ताने मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदीपच्या (लाईट) पोलवर हायड्रॉ(क्रेन)द्वारे झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना प्रथमोपचार करून मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.जखमी आणि मयताची नावे अद्याप समजली नसुन पुढील तपास पोलीस करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आगामी 19 तारखेला शिवजयंती निमित्ताने मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या तयारी निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचा काम सुरू आहे मनमाड शहरातील मनमाड नांदगाव महामार्गावर हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदीप पोलवर क्रेंद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या टॅंकरने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशा चुरा झाला आहे रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती मुळात राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे ध्वज लावणे हे नियम बाह्य आहे मात्र परवानगी घेऊन ते लावता येऊ शकतात यासाठी पुरेशी खबरदारी घेऊन प्रॉपर सिक्युरिटी करून काम करायला हवे याशिवाय दिवसाच्या उजेडात हे काम करणे गरजेचे असतांना रात्रीच्या अंधारात हे ध्वज लावले जात होते यात टँकर चालकांला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.यात अजून किती जण जखमी आहेत हेही अद्याप समजले नाही यातील आतापर्यंत फक्त पाच जण समजले असुन यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गँभिर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं व जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यातील दोन जणांना डॉक्टरानी मृत घोषित केले तर इतर तीन गँभिर जखमींना मालेगाव येथे हलवले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago