कंटेनर रिक्षावर कोसळून दोघांचा मृत्य

शहापूर : प्रतिनिधी

घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात गुरुवारी (दि. 9) दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रासायनिक कंटेनर रिक्षावर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांबाबत वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून घोडबंदर मार्गे रासायनिक पदार्थ वाहून नेणारा कंटेनर आनंदनगर येथील डी-मार्ट मॉलजवळ आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर रस्त्यावर उलटला. त्याचवेळी शेजारून जात असलेल्या रिक्षावर कंटेनरचा मागील भाग कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात रिक्षाचालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले अमजित हे गंभीर जखमी झाले.

Two killed after container falls on rickshaw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *