सिडको : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
औद्योगिक परिसरातील रस्ते आधीच अरुंद असताना, कंपन्यांच्या प्रवेशद्वारांसमोरील अतिक्रमणे आणि रस्त्यांवरच उभ्या केल्या जाणार्या अवजड कंटेनरमुळे वाहतुकीची कोंडी व अपघातांचा धोका वाढला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने ज्याप्रमाणे शालेय वाहनांवर कारवाई सुरू केली आहे, त्याच धर्तीवर रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या राहणार्या कंटेनरवरही कारवाई करावी, अशी मागणी आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील चारही नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा, तसेच महापालिका अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्त मोहीम राबवून रस्ते मोकळे करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Two killed in two-wheeler collision in Satpur