नाशिक

अपघातात चिमुरडीसह दोन ठार

येवल्यात वाहतूक कोंडीमुळे अपघातांमध्ये वाढ

येवला : प्रतिनिधी
शहरातील येवला-मनमाड राज्य महामार्गावर धानोरे शिवारातील मोठा मारुती मंदिरासमोर सकाळच्या सुमारास पादचारी तरुणाला वाहनाने धडक दिली. त्यात गणेश हिरे (वय 31) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर येवला शहरातील फत्तेबुरुज नाका भागात हॉटेल ओम गुरुदेवसमोर दुसरा अपघात झाला. टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार देवीदास शेळके (वय 55) गंभीर जखमी झाले, तर त्यांची नात जयश्री शेळके (वय 6) हिचा जागीच मृत्यू झाला. जखमी देवीदास शेळके यांच्यावर येवला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्हीही अपघातप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात चालकांविरोधात गुन्हा दाखल
झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून येवला शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. अनेक वाहने येवला शहरातील महामार्गावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील येवला-मनमाड महामार्गावर एस.एस. मोबाइल शॉपीसमोर ट्रकच्या धडकेत विजय आहेर यांचा मृत्यू झाला. वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने वाहतुकीची कोंडी थांबवावी, अशी मागणी आहे.

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago