नाशिक

मुंबईतून दहा लाखांची रोकड लंपास करणारे दोघे आडगाव पोलिसांच्या जाळ्यात

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंधेरी (मुंबई) येथून सुमारे दहा लाखांची रोकड चोरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या दोन संशयितांना आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने थरारक पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून 8 लाख 94 हजार रुपयांची रोकड, कार आणि मोबाइलसह 16 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंधेरी (मुंबई) येथून सुमारे 10 लाखांची रोकड लंपास करून नाशिककडे येणार्‍या दोन चोरट्यांना आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने थरारक पाठलाग करून अटक केली. राहुल शिवप्रसाद जैसवाल (रा. महाकाली, अंधेरी पूर्व) आणि शिवम सिंह (रा. मिलिंदनगर, पवई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 8 लाख 94 हजार रुपयांची रोकड, स्विफ्ट डिझायर कार आणि दोन मोबाइल फोन असा एकूण 16 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, इम्रान शेख, नीलेश काटकर, श्रीकांत महाजन, मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके आणि नीलेश दिवटे यांनी केली.

Two men who made off with ₹10 lakh in cash from Mumbai have been nabbed by the Adgaon police.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

6 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

7 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

7 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

7 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

7 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

7 hours ago