नाशिक

सिन्नरमध्ये चोरट्याकडून दोन मोटारसायकल जप्त

पोलिसांची कारवाई : 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्ह्यांचा उलगडा

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात वाढत्या मोटारसायकल चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सिन्नर पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा मोबाइल तसेच दोन मोटारसायकल, असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोरख बाळू पिंपळे (वय 35, रा. झापवाडी, ता. सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सरदवाडी रोड परिसरात सापळा रचून गोरख पिंपळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून विनाक्रमांकाची प्लॅटिना मोटारसायकल मिळाली. पुढील चौकशीत चोरीचा रेडमी कंपनीचा मोबाइल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीवर यापूर्वी वावी, सिन्नर आणि मनमाड पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई गुन्हेशोध पथकातील समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड आणि प्रशांत सहाणे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार हेबांडे करीत आहेत.

Two motorcycles seized from thief in Sinnar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago