CRIME red text round stamp, with zig zag border and vintage texture.
मॅनेजरला मारहाण करून रोकड लंपास
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी परिसरातील हॉटेल सर्वज्ञ अँड लॉजिंग येथे रूम पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या पाच जणांनी मॅनेजरला धमकावत मारहाण करून काउंटरमधील सुमारे 22 हजार 500 रुपयांची रोकड व ग्राहक नोंदवही असा एकूण सुमारे 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 28 मार्च रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेलचे मॅनेजर नसीम मोहम्मद खान (वय 51, रा. साईबाबा मंदिराजवळ पांगरी बुद्रुक, ता. सिन्नर, हल्ली रा. वात्सल्य संकुल, सप्तशृंगीनगर, सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी केए 35-एए 1798 क्रमांकाच्या कारमधून आले होते. त्यांनी हॉटेलमध्ये रूम पाहण्याचा बहाणा करत मॅनेजर नसीम खान यांना धमकावले. त्यानंतर धक्काबुक्की करून मारहाण करत काउंटरमधील 500 व 100 रुपयांच्या चलनी नोटांमधील 22,500 रुपये रोख रक्कम तसेच ग्राहकांची नोंद असलेली वही जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी विजयकुमार महादेव बेन्नूर (वय 47, रा. देवरही, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक), के. नागप्पा (वय 45, रा. बेलारी, कर्नाटक), सी. महाराजा (वय 19), अभिषेक मानतेश अप्पा कोरासर (वय 20) यांच्यासह इतर एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(2) नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.
Robbery in a hotel on the pretext of checking the room
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…