दोन हजारांची लाच घेताना सातपुरचे दोन पोलीस जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्याना रंगेहाथ पकडण्यात आले. धनराज सोनु गावित वय-57 पद- सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वर्ग -3
आणि पोलीस हवालदार कांतीलाल रघुनाथ गायकवाड
दोन्ही नेमणुक सातपुर पोलीस स्टेशन नाशिक अशी या लाचखोरांची नावे आहे- यातील तक्रारदार यांचे सुमारे 6 वर्षांपूर्वी सातपुर येथील सम्राट बिल्डर यांचे कडे अपना घर स्कीम नं 1 आनंदवल्ली शिवार नाशिक येथे रुपये 23,50,000/-मध्ये 2 BHK फ्लॅट बुक केले होते .व त्यासाठी सम्राट बिल्डर चे डायरेक्टर श्रीमती श्वेता गुप्ता यांचे बॅंक अकाउंटवर 21000/-रु चेक द्वारे दिले होते .पैसे देऊन 6 वर्षांचा कालावधी झाला तरी सुद्धा यातील तक्रारदार यांना फ्लॅटचे कागदपत्र किंवा ऍडव्हान्स म्हणुन दिलेले 21000/- परत न दिल्याने तक्रारदार यांनी सातपुर पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता .सदर अर्जांची चौकशी गावित व पोहेवा.गायकवाड यांच्याकडे देण्यात आली होती .सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी पोहेवा गायकवाड व गावित यांनी तक्रारदार व सम्राट बिल्डरचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवुन आणुन तक्रारदार यांना सम्राट बिल्डरचे प्रतिनिधी यांनी 21000/-हजार रु चेक दिला होता .म्हणून यातील आलोंसे गायकवाड व गावित यांनी आम्ही तुमचे काम करून दिले त्याबद्दल आम्हाला बक्षीस म्हणून रक्कम द्या .असे सांगितले परंतु यातील तक्रारदार यांची लाच द्यायची इच्छा नसतांना ,रोख स्वरूपात 2000/-दिले होते .त्यानंतर दिनांक 23/10/2024 रोजी आरोपी नं 2 गावित यांनी पुन्हा पैशाची मागणी करून व आरोपी नं 1 यांची पैसे मांगणी बाबत पडताड़णी करून ,दिनांक 24/10/2024 रोजी यातील आरोपी नं 2 याने आरोपी नं 1 यांच्या समक्ष संमतीने व दोन पंच्याच्या समक्ष 2000/- रु ची लाच घेतांना रंगेहात मिळुन आले आहे . दोन्ही आरोपींविरुद्ध सातपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे . परिवेक्षण तथा तपासी अधिकारी एकनाथ गं.पाटील, पो.हवा.सुनील पवार ,पोना अविनाश पवार ,पोहेवा ,दिनेश खैरनार यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक
श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…