सिन्नरजवळ स्विफ्ट डिझायरचा अपघात
सिन्नर : प्रतिनिधी
लोणावळा आणि मुंबई येथे पर्यटन करून यवतमाळला परतणार्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी (दि.6) पहाटे मर्हळ शिवारात ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दुभाजकाला धडक लागली की अन्य वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला, याचा तपास वावी पोलीस करत आहेत.
मृतांमध्ये जहिफखान नैमुला खान (वय 23, रा. प्रभातनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) आणि अदमार अहमद मोसिमदिन शेख (वय 22, रा. बंजारा हिल्स, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 6) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक 550.3 येथे मुंबईकडून नागपूरकडे जाणारी एमएच 24 बीडब्ल्यू 7962 क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार अपघातग्रस्त झाली. पसायदान अॅम्ब्युलन्सचे चालक अल्पेश मनसाराम देवरे यांनी दोघांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत
घोषित केले.
या प्रकरणी देवरे यांनी दिलेल्या माहितीवरून वावी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गोडे पुढील तपास करीत आहेत.
Two students die in an accident on the Samruddhi Mahamarg.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…