नाशिक

लासलगाव-ठाणगाव, सिन्नर-हिवरे फाटा रस्त्यांवरील त्रुटी दूर होणार

भाजपा नेते सांगळे यांची तहसील कार्यालयात बैठक; सुरक्षा भिंत, मोर्‍या, गतिरोधकांसह प्रलंबित कामांना गती

सिन्नर : प्रतिनिधी
लासलगाव-ठाणगाव आणि सिन्नर-हिवरे फाटा या दोन महत्त्वाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करण्याबरोबरच प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येणार आहे. शिवाय, सुरक्षेच्या उपायोजनाही करण्याचे आश्वासन संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने दिले.
गुरुवारी (दि.6) भाजपाचे नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विविध त्रुटी दूर करून संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. सांगळे यांनी नागरिकांच्या समस्या अधिकार्‍यांसमोर मांडत त्यावर त्वरित निर्णय घेण्याची
मागणी केली.
बैठकीस तहसीलदार सुरेंद्र देशमुख, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सतीश चिपळूणकर, श्रीजी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी परतुल चौधरी, धुळवाडचे सरपंच दादाहारी सांगळे, निखिल भेंडाळे, रमेश आव्हाड आदी उपस्थित होते.
लासलगाव-पंचाळे-पांगरी-दोडी-दापूर-धुळवाड-ठाणगाव मार्गावरील अपूर्ण कामे, धुळवाड घाटातील सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकर्‍यांच्या अडचणींचा बैठकीत आढावा घेण्यात आला. घाट परिसरात सुरक्षा भिंत उभारणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी मोर्‍या बांधणे तसेच दोडी आणि दापूर परिसरातील शिल्लक कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दापूर चौफुलीवर अपघातांचा धोका लक्षात घेऊन गतीरोधक आणि वाहतूक बेट उभारण्यात येणार आहे.
सिन्नर-हिवरे फाटा मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे डुबेरेवाडी परिसरातील काही शेतांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. पांडुरंग सदगीर यांच्यासह अन्य शेतकर्‍यांच्या शेतालगत आवश्यक त्या ठिकाणी मोर्‍या टाकून पाण्याचा निचरा करण्याचे संबंधित कंपनीने
मान्य केले.

डुबेरे स्मशानभूमीच्या रस्त्यालाही मंजुरी

डुबेरे येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ग्रामपंचायतीने कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Defects on the Lasalgaon-Thangaon and Sinnar-Hivare Phata roads will be rectified.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

8 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

9 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

9 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

9 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

9 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

9 hours ago