मोखाड्यातील दोन विद्यार्थ्यांची आश्रमशाळेत गळफास घेऊन आत्महत्या

नामदेव ठोमरे
खोडाळा  : पालघर जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेचा सुरक्षा प्रश्न चर्चेत असताना पुन्हा एकदा वाडा तालुक्यातील आंबिस्ते शासकीय अनुदानित पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ वस्तीगृह निवासी असलेले मोखाडा तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर विद्यार्थ्यांचे मृतदेह वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावातील  एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्या कार्य क्षेत्रात येणारी आदिवासी वस्तीगृह व वस्तीशाळेत शिक्षण घेणारे विदयार्थी 1)देविदास परशुराम नावळे इयत्ता 10 रा. बिवळपाडा ता . मोखाडा. 2) मनोज सीताराम वड इयात्ता  9 वी  रा. दापटी ता. मोखाडा  हे विद्यार्थी  शिक्षण घेण्यासाठी या आदिवासी वस्तीगृहात होते.या दोन्ही विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याचा कारण समजू शकले नाही यामुळे संबंधित विभागावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ठाणे व पालघर जिल्ह्यातील 520 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून आत्महत्या केलेले विद्यार्थी हे पहिलीपासूनच या शाळेत शिकत होते त्यांचे वर्तन हे चांगले असून अभ्यासात प्रगती ठीक  होती अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते यांनी दिली

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago