नाशिकरोड रेल्वे पोलिसांची कारवाई
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत बसलेल्या प्रवाशाला गाठून, त्याला दमदाटी करत हातातील मोबाइल हिसकावून पळ काढणार्या दोन सराईत चोरट्यांना नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत जेरबंद केले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल हस्तगत केला असून, दोघेही आरोपी अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 जुलै रोजी फिर्यादी हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. यावेळी दोन संशयित आरोपी त्यांच्याजवळ आले. तू कुठे चालला आहेस, असे विचारत त्यांनी फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली. फिर्यादी काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्यांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावला आणि गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. याप्रकरणी फिर्यादी यांनी तात्काळ नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांची पथके तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आली. एएसआय संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, हेड कॉन्स्टेबल शैलेश पाटील आणि आरपीएफ आरक्षक सागर संतोष वर्मा यांनी सर्वप्रथम स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही
फुटेजची कसून तपासणी केली.
फुटेजमध्ये संशयितांचे चेहरे आणि हालचाली टिपल्यानंतर पोलिसांनी स्टेशन परिसरातच त्यांचा शोध सुरू केला.
अवघ्या सहा तासांच्या आत पोलिसांनी स्टेशन परिसरातच संशयास्पदरीत्या फिरणार्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ईश्वर रमेश इंगळे (35) व संजय विजय इंगळे (28, दोघे रा. मु. निमकर्दा, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल जप्त केला आहे. सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पालवे, एसडीपीओ वसंत भोये, प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ पोलीस निरीक्षक नवीन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आत्माराम कामजळगे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे, हेड कॉन्स्टेबल शैलेश पाटील, हेड कॉन्स्टेबल सचिन दैवे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कांबळे, आरपीएफ आरक्षक सागर वर्मा आणि एमएसएफ जवान गोकुळ राठोड यांच्या पथकाने बजावली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Two thieves who snatched a mobile phone and fled were arrested within six hours.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…