पती फरार, गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील जयभवानी रोड परिसरातील साम्राज्य बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (दि. 10) सकाळी साडेअकराच्या सुमारास चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. वैशाली हनुमान हिंगे असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार
झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना काशिराम बलखंडे (वय 53, रा. साम्राज्य बिल्डिंग, जयभवानी रोड) या मुलगी वैशाली, नात स्वरा आणि जावई हनुमान त्र्यंबक हिंगे (मूळ रा. परभणी) यांच्यासह वास्तव्यास आहेत. वैशाली व हनुमान यांचा दोन महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर हनुमान हा वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शुक्रवारी सकाळी मीना बलखंडे या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना वैशालीने त्यांना फोन करून, पतीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती दिली आणि तातडीने घरी येण्यास सांगितले. घरी पोहोचल्यावर मीना बलखंडे यांना वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर गंभीर जखमा झालेल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, हनुमान याने वैशालीला परभणीला सोबत येण्याचा आग्रह धरला होता. तिने नकार दिल्यानंतर, “तू माझ्यासोबत येत नाहीस तर आज तुला संपवून टाकतो,” अशी धमकी देत त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. उपचारादरम्यान वैशालीने ही माहिती पोलिसांना दिली.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमी वैशालीला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत गंभीर असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह उपनगर पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित हनुमान त्र्यंबक हिंगे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
Wife attacked with intent to kill over suspicions regarding her character.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…