नाशिक

कुंभमेळ्यापूर्वी सिन्नर थर्मलचे दोन युनिट सुरू होणार

महाजनको-एनटीपीसीचा ऐतिहासिक करार; सिन्नरच्या विकासाला नवी ऊर्जा

सिन्नर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे रखडलेला सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प आता पुन्हा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी 270 मेगावॉट क्षमतेचे दोन युनिट सुरू करण्याचे उद्दिष्ट महाजनकोने निश्चित केले आहे. या दिशेने निर्णायक पाऊल टाकत महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडच्या अधिग्रहणासाठी भागधारक करारावर अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) मंजूर केलेल्या ठराव योजनेनुसार 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत 3800 कोटी रुपये महाजनको व एनटीपीसीकडून भरण्यात येणार आहे. त्यानंतर सिन्नर थर्मल प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया
कार्पोरेट दिवाळखोरी निवारण कायदा (आयबीसी) 2016 अंतर्गत राबविण्यात येत आहे. नवी दिल्ली येथील एनटीपीसीच्या स्कोप कार्यालयात झालेल्या करारावेळी महाजनकोकडून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., संचालक (प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता (प्रकल्प व नियोजन) अतुल सोनजे, तर एनटीपीसीकडून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचलन) रविंदर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिन्नर परिसराला मिळणार नवा श्वास

सिन्नर थर्मल प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यास सिन्नर व परिसरातील शेकडो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. रस्ते, वाहतूक, निवास व इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या वाढत्या औद्योगिक व घरगुती वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.

कोळसा पुरवठ्यासाठी हालचाली सुरू

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी पहिल्या टप्प्यात दोन युनिट सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कोळसा पुरवठ्यासाठी महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी देशपातळीवरील कोळसा पुरवठा करणार्‍या कंपन्यांशी चर्चा करत आहेत, अशी माहिती महाजनकोचे मुख्य अभियंता अतुल सोनजे यांनी दिली.

Two units of Sinnar Thermal to be commissioned before Kumbh Mela

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago