नाशिक

चार्जिंगदरम्यान दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट

अश्विननगरमधील घटना, जीवितहानी टळली

सिडको : प्रतिनिधी
सिडको परिसरातील अश्विननगर येथे चार्जिंगला लावलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा गुरुवारी दुपारी अचानक स्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरातील काही वस्तूंचे नुकसान झाले. स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास जगताप कुटुंबीय घरी असताना त्यांनी दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावली होती. काही वेळानंतर मोठा आवाज झाल्याने त्यांनी धाव घेऊन पाहिले असता, बॅटरीचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. स्फोटानंतर घरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे प्रमोद लहानगे, मुकुंद सोनवणे, फायरमन पंकज शिंदीकर, अजिंक्य वजरे आणि वाहनचालक सुनील घुगे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, दुचाकी किंवा इतर उपकरणांच्या बॅटर्‍या चार्जिंगला लावताना दर्जेदार चार्जरचा वापर करावा, चार्जिंग सुरू असताना देखरेख ठेवावी.

Two-wheeler battery explodes while charging.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

25 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

30 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

34 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

46 minutes ago