नाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेवर ताण

भारतीय पुरातत्त्व विभागाचा शिवलिंगाबाबत दुजोरा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात असलेला प्राचीन अमृत कुंड तलाव उपसण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण विभागाने मंदिर आणि तलाव संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. तलाव कोरडा करत असताना तळाला शिवलिंग असल्याचे छायाचित्रण माध्यमांनी प्रसिद्धीस आणले. सुरुवातीला त्याची पुष्प वाहून उपस्थितांनी पूजा केली. त्याचेदेखील चित्रण समाजमाध्यमात व्हायरल झाले. त्यानंतर मात्र विश्वस्त मंडळाने हे शिवलिंग नसल्याचा खुलास केला.
यापूर्वी तलाव उपसला असता त्यावेळी तळाच्या खळग्यात जवळच आढळून आलेला नर्मदेतील गोटा ठेवला, असे सांगण्यात आले. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेदेखील समाजमाध्यमात आपले मत व्यक्त केले आणि यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. तथापि त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त आता अमृत कुंडाच्या बाबत चौकशी करतात तसेच त्या तलावात असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आग्रह धरताना आढळतात. याचा थेट परिणाम येथील सुरक्षाव्यवस्थेवर झाला आहे. अमृतकुंड तलाव हा अत्यंत खोल आहे.
पाण्याने पूर्ण भरलेला असतो.त्यामध्ये शिवलिंग स्थापन करून त्याची कोण आणि कशी पूजा करत असते, याबाबत कोणीही गांभीर्याने विचार करत नाही. या तलावातील पाणी त्र्यंबकेश्वराच्या नित्य पूजा अभिषेकासाठी घेतात. या तलावाचे पावित्र्य राहावे, त्यामध्ये भाविकांनी काही टाकू नये तसेच अनवधानाने अथवा अज्ञानाने एखादा त्यात उतरला तर जीव जाण्याची भीती आहे. त्यासाठी हा तलाव बॅरिकेडींग लावून बंदिस्त केला आहे. विशेष म्हणजे, भाविकांना सत्य स्थिती सांगण्याची आवश्यकता असताना भारतीय पुरातत्त्व विभागाने स्वत: ची पाठ थोपटून घेण्यासाठी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यांच्या प्रयत्नाने उल्लेखनीय शोध लावला, असा दावा त्यांनी केला आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाने शिवलिंग सापडले असल्याचा व त्यासाठी आपण कार्य करत असल्याचा दावा करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांना उत्सुकता निर्माण होऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यासाठी जबाबदार कोणाला धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाहक समस्या निर्माण

पुरातत्त्व विभाग पाच वर्षांपूर्वी ठेवलेल्या शाळुंकेला प्राचीन मान्यता देत असेल तर याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या विभागाच्या अशा प्रकारच्या कारभाराने नाहक समस्या निर्माण होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील नागरी जीवनाला त्याचा कायम त्रास सहन करावा लागत आहे . याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याचे काम शासनाचे विभाग करत आहे. नागरिकांनी डोळसपणे याकडे पहावे, असे आवाहन केले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर शिवलिंगात बर्फ प्रकट झाल्याचा बनाव काही वर्षांपूर्वी केला होता. त्याबाबत देशभर प्रचार-प्रसार झाला ते प्रकरण बनावट असल्याचे पुढे उघड झाले. तसाच हा प्रकारदेखील बनावट आहे, याची गांभीर्याने दखल घ्यावी. – कृष्णा चांदगुडे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Strain on the security system at Trimbakeshwar Temple.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

1 minute ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

7 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

14 minutes ago

टोमॅटोची ‘लाली’ घसरली; निर्यातबंदीचा फटका

निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्‍यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…

19 minutes ago

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

24 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

29 minutes ago